आवारे पाटलांच्या डोक्यावर 'तुळशी'पत्र

मुंबई - जेमतेम खप असलेल्या दैनिक 'जनशक्ति'मध्ये कार्यकारी संपादक पुरूषोत्तम आवारे - पाटील यांच्या डोक्यावर 'तुळशी'पत्र ठेवण्यात आले आहे.पिंपरी- चिंचवडच्या सिध्दीविनायक  मुख्यालयातून मालकांनी आदेश काढत संपादक म्हणून तुळशीदास भोईटे यांची नियुक्ती केली आहे.भोईटे जॉईन झाल्यामुळे आवारे- पाटील यांची विकेट पडण्याची शक्यता आहे.
उलटी गंगा आणत मालकांनी जळगावचा 'जनशक्ति' हा पेपर पिंपरी चिंचवड,पुणे अणि मुंबईमध्ये सुरू केला मात्र 'जना'ची 'शक्ति' नसलेला हा पेपर जळगाव वगळता अन्य ठिकाणी सपशेल फेल ठरला आहे.लेआऊट आणि प्रिटींग चांगली असतानाही कंटेन्ट नसल्यामुळे हा पेपर जेमतेम खपावर आणि प्रचंड तोट्यात  सुरू आहे.मालक कुंदन ढाके यांची मोठी स्वप्ने असतानाही लायक कार्यकारी संपादक न मिळाल्यामुळे  पेपरची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.यापूर्वी आक्रमक, धडाकेबाज संपादक असताना सुरु झालेला झंझावात आता पूर्णपणे थांबला आहे. जळगावात शेखर पाटलांनी डोलारा चांगला सांभाळला असला तरी पुण्यात गोेविंदा गोपाला सुरू आहे.उदय भविष्यपत्रामध्ये असताना नगरच्या एका वार्ताहराकडून पूजेसाठी हरणाचे कातडे घेतले म्हणून हकालपट्टी झालेले जोशी बुवा हरणाचे कातडे सोडायला तयार नाहीत. पिंपरी - चिंचवडमध्ये निवासी संपादक आणि कला संपादकामध्ये तू - तू मै - मै सुरू आहे.मुंंबईत आवारे पाटील टीम लिडर म्हणून सपशेल अपयशी ठरले आहेत.त्यामुळे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मालकांनी आवारे - पाटलांच्या डोक्यावर तुळशीपत्र ठेवत संपादक म्हणून तुळशीदास भोईटे यांची नियुक्ती केली आहे.
जाता जाता 
बोगस इन्कम टॅक्स अधिकारी बनून रेड घालताना अटक केलेल्याकडे कारभार दिल्याने वृत्तपत्र इमेजची पार वाट लागलीय... स्तुती पर पुरवण्या काढून कुणाला सुखावता येत असेल असा समज असेल तर ते शेखचिल्ली स्वप्नरंजन ठरावे!