महाराष्ट्र 1 आर्थिक डबघाईस ....

मुंबई - जानेवारी 2016 मध्ये सुरू झालेले महाराष्ट्र 1 न्यूज चॅनल आर्थिक डबघाईस आले आहे.ज्यांना 50 हजारापेक्षा जास्त पगार आहे,त्यांचा पगार गेल्या चार महिन्यापासून निम्माच दिला जातोय.राज्यातील स्ट्रींजर रिपोर्टरना गेल्या सहा महिन्यापासून मानधन नाही.पुणे आणि नागपूरच्या ब्युरो ऑफिसचे भाडे थकल्याने मालकांनीं त्यांना ऑफीस सोडण्यास भाग पाडले.पुण्याचे ऑफीस तीन महिने बंद पडले होते.आता नव्या जागेत स्थलांतरीत झाले तरी त्याचे भाडे देण्यात आले नाही.नागपूरचीही तीच बोंबाबोंब सुरू आहे.नाशिकसह अनेक ठिकाणच्या व्हॅन बंद पडल्या आहेत.काही कॅमेरामनच्या पगारी थकल्याचेही कळते.
आर्थिक तंगाईमुळे वागळे मास्तर जाम भकडले आहेत.त्यांचे आणि मँनेजमेंटचे कडाक्याचे भांडण झाल्याचे समजते.सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांना डिबेट शोमधून हाकलून लावल्यानंतर वागळे मास्तर आणि मँनेजमेंटचे चांगलेच वाजले आहे.तेव्हापासून वागळे मास्तर रजा टाकून सुट्टीवर गेले आहेत.त्याचबरोबर अनेक अँकर दुुसर्‍या संधीच्या शोधात आहेत.
दुसरीकडे महाराष्ट्र 1 साठी नव्या पार्टनरचा शोध सुरू आहे.कोल्हापूरच्या एका तंबाखू आणि गुटखा विक्रेत्यास 'घोड्या'वर बसवण्याचा प्रयत्न सुरू आहे.त्यांच्यासोबत दोन मिटींगा झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.हा नवा पार्टनर मिळाला तर महाराष्ट्र 1 ची आर्थिक बाजू सक्षम होईल अन्यथा चॅनलची अवस्था अधिक कमजोर होईल.