दोस्त,दोस्त न रहा...'कलमनामा' अखेर बाहेर पडणार !

मुंबई - १ जानेवारी २०१६ रोजी सुरू झालेल्या आता जग बदलेल ! चॅनलमधून एक सनसनाटी बातमी हाती येत आहे.अवघ्या चार महिन्यात ;कलमनामा; आणि 'कलम करणा-या'मध्ये टोकाचे मतभेद तयार झाले असून,त्यामुळे 'कलमनामा' लवकरच बाहेर पडणार असल्याची पक्की खबर हाती आली आहे.
'कलमनामा' आणि 'कलम करणा-या'ची 'ग्रेट भेट' ३० वर्षापुर्वी महानगरमध्ये झाली.तेव्हापासून दोघे एकमेकांचे जीवलग मित्र.सहा वर्षापुर्वी कलम करणारा 'चला जग जिंकू' या चॅनलमध्ये गेला तर 'कलमनामा'ने स्वत:चे साप्ताहिक काढले.तरीही मैत्री कायम होती.'चला जग जिंकू' मध्ये 'कलमनामा' टॉक शो मध्ये गेस्ट म्हणून येत असे.
नंतर कलम करणा-याची 'चला जग जिंकू' यामधून हकालपट्टी झाली आणि तिकडे 'कलमनामा'ही बंद पडला.'आता जग बदलेल' या चॅनलमध्ये पुन्हा हे जुने मित्र एकत्र आले,'कलमनामा'कडे कार्यकारी संपादकपदाची जबाबदारी देण्यात आली.'कलमनामा'ला प्रिंट मीडियात मास्टर असला तरी टीव्ही मीडियात नवीच होता.येथे क्षणाक्षणाला निर्णय घ्यावे लागतात आणि बदलावे लागतात.तसेच प्रिंट मीडीयाची भाषा टीव्ही मीडीयात चालत नाही.येथे शॉर्ट बीट स्वीट लिहावे लागते.परंतु स्क्रीप्टही नीट लिहिता येईना,सर्वच आघाड्यावर 'कलमनामा' अयशस्वी ठरू लागला.त्यामुळे कलम करणारे कलमनामावर चिडू लागले,इतकेच काय तर चार चौघात झाप झाप झापू लागले.ते नित्याचे होवून गेले.त्यामुळे 'कलमनामा' नाराज झाला.कलम करणा-याकडून सातत्याने अपमान होत असल्याने त्यांनी मध्यंतरी आठ दिवस रजाही घेतली,परंतु पुन्हा तोच तोच अपमान होवू लागल्याने 'कलमनामा'ने 'आता जग बदलेल' सोडण्याचा निर्णय घेतल्याची पक्की खबर 'बेरक्या'च्या हाती आली आहे.
खरं तर कलम करणा-यास 'कलमनामा'ने वाईट वेळेला भक्कम साथ दिली.जेव्हा जेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला,त्याचे वार 'कलमनामा'ने स्वत:वर घेतले,परंतु काळाच्या ओघात कलम करणारा पुढे गेला अणि 'कलमनामा' आहे त्या जागेवर राहिला. 'आता जग बदलेल' निमित्ताने दोघे एकत्र आले खरे,परंतु पुर्वीचा कलम करणारा पार बदलून गेल्याने' दोस्त दोस्त न रहा,प्यार प्यार न रहा',असे झाले.त्यातून अखेर कलमनामा वेगळा होत आहे."आता जग बदलेल" मध्ये "चला जजिंकू" या चॅनलची जुनी टीम आहे,तेच कलमनामा ला टार्गेट करत होते.अत्यंत घाणरड्या पध्दतीने राजकारण सुरू होते.त्यात  कलमनामा अस्वस्थ होता.त्याची धग शेवटी वेगळे होण्यापर्यंत पोहचली आहे.