420 मोतेवार, सत्पाळकर यांच्या संपत्तीचा शोध सुरू


सीबीआयची धडक कारवाई
राजकीय लाभार्थी नेते रडारवर
कर्मचारी, एजंटस् धास्तावले
पीएफ व टीडीएसचेही पैसे बुडाले

सर्वसामान्यांकडून बेकायदेशीररित्या पैसे गोळा करून त्यांच्या अब्जावधी रुपयांची लूट करणार्‍या 
चिटफंडमधील बहुतेक आरोपींचा बाजार उठला आहे. ‘समृद्ध जीवन’चे महेश मोतेवार ‘मैत्रेय’च्या वर्षा 
सत्पाळकर, ‘साई प्रसाद’चे भापकर, ‘सहारा’चे सुब्रतो रॉय यांसह अनेक आरोपी सध्या तुरुंगाची हवा खात आहेत. चिटफंड कंपन्यांच्या या ‘420’ मालकांच्या संपत्तीचा ‘शोध’ सध्या चालू आहे.

या 420 आरोपींनी मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकांत ज्या राजकीय नेत्यांना ‘अर्थ’पूर्ण ‘रसद’ पुरवली त्या सर्व बड्या धेंड्यांचाही शोध सीबीआय सध्या घेत असल्याचे सूत्रांकडून समजतेे. 

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवून ‘मराठा आरक्षणा’चे राजकारण करणारे व केतकरांच्या घरावर हल्ला करण्याचा आरोप असणारे कथित बडे राजकीय नेतेही सध्या सीबीआयच्या रडारवर आहेत. सीबीआयने या व इतर नेत्यांवरही त्यांची वक्रदृष्टी ठेवली असून त्या सर्वांची नावे लवकरच जाहीर करण्याची व त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया चालू असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर  सांगितले.

या सर्व आरोपींनी त्यांची प्रसारमाध्यमे व धंद्यातील कर्मचारी, एजंटस् यांचे पीएफ व टीडीएस सरकारदरबारी भरले नसल्यामुळे कर्मचारी हवालदिल झाले आहेत. या सर्व आरोपींची प्रसारमाध्यमे, कंपन्या जवळपास बुडाल्यात जमा आहेत. 

संकटकाळी कोण कामास येत नाही, हे मोतेवारांना  कळून चुकले आहे. त्यांनी निखील वागळे, कुमार 
केतकर, भारतकुमार राऊत यांसारख्या मराठी पत्रकारितेतील ज्येष्ठ पत्रकारांना कामाला ठेवले. यापैकी 
वागळेंनी स्वतःचे ‘काम’ झाल्यावर मोतेवारांना रामराम ठोकला. भारतकुमार राऊतांनी राजीनामा दिला. 

तरीही ते आजपर्यंत माध्यम सल्लागार म्हणून ‘मी मराठी’वर कार्यरत असल्याचे आढळते. उठसूठ जगाला शहापण शिकवणार्‍या केतकरांनी मात्र 420 मोतेवारांची चाकरी करणे सोडले नाही, या सर्व संचालकांवर ‘एमपीआयडी’ अ‍ॅक्ट लागू करावा व त्यांची संपत्ती जप्त करण्यात यावी, अशी मागणी हिंदू विधिज्ञ परिषदेने केली आहे. 

मोतेवारांनी सर्वसामान्यांना लुबाडून गोळा केलेल्या कोट्यवधी रुपयांतून ‘मी मराठी’ व ‘लाईव्ह इंडिया’ ही प्रसारमाध्यमे सुरू केली आहेत. त्यामुळे या कंपन्यांवर बसलेल्या या संचालकांची संपत्ती जप्त करण्यात यावी व त्यांना तुरुंगात खडी फोडायला पाठवण्यात यावे, अशी मागणीही परिषदेने केली आहे. 

‘मैत्रेय’च्या वर्षा सत्पाळकर यांच्या मास कम्युनिकेशनच्या हेड जयश्री देसाई यांच्यावरही ‘एमपीआयडी’ कायदा लागू करावा व त्याचं रवानगी तुरुंगात व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप इनकर 
यांनी केली आहे.
  
उन्मेष गुजराथी
9322 755098