ना 'धार' ! ना 'प्रहार' ! सगळे गार !!

दैनिक प्रहार मोठ्या थाटात सुरु केला तीन संपादक येवून देखील या
वृत्तपत्राचा कारभाराबद्दल काय बोलावे ? सुरुवातीला लट्ठ पगाराच्या
वल्गना करणारा हा पेपर आता कित्येक महिने पगारच देत नाही आणि हे बघणारा
कोणी खमक्या पण वृत्तपत्रात नाही.लॉबिंग आणि पुढे पुढे करणाऱ्यांचे
चांगले दिवस या वृत्तपत्रात सुरु आहेत. कोकणातील जनतेला पर्याय असलेला हा
प्रहार आता धार गमावत आहे.पगार थकविल्या बद्दल व्यवस्थापन आणि संपादकीय
विभागाला जरा देखील खंत वाटत नाही आणि मालक वर्गाला याकडे लक्षच द्यायचे
नाही असे दिसत आहे.न प्रहार ना धार ना पगार अशी सध्याची अवस्था आहे.सगळे
गार आहे.निव्वळ पश्चाताप पदरी पडला आहे.गप्पा मोठ्या आणि ..... असा
प्रकार सुरु असून पगार न देता वृत्तपत्रे पत्रकारितेवर खरा अन्याय करत
आहे.
कार्यालयात बसून स्वताच्या पगाराची रक्कम काढून घेणारे मात्र
वार्ताहरांचे पगार काढण्यास का कुचराई करतात हे गणितच उलगडत
नाही.वृत्तपत्र हा आतबट्ट्याचा व्यवहार असेल तर मग याची जाणीव आधीच असली
पाहिजे अनेक नामवंत वृत्तपत्र नाव मोठे लक्षण खोटे असे आहे वार्ताहर तर
नेमतात पण पगाराच्या नावाने बोंब आणि डेस्क बसलेले दीड शहाणे मात्र अगदी
रुबाबात सकाळी फोन करणार अरे हि बातमी नाही ती बातमी नाही आली आणि हेच
दीड शहाणे चांगल्या बातम्या कश्या दाबतात हे वेगळे सांगायला नको.सगळेच
अंशकालीन वार्ताहर काही भुरटे नसतात.प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा
असते पण डेस्कवर बसलेले टिकोजीराव या वार्ताहरांना काम करू देत नाही.अहो
या वार्ताहराला पगार मिळत नसेल आणि रोजच्या अडचणी येत असतील कुटुंब
व्यवस्था सांभाळायची असेल तर त्याने करावे तरी काय ? पण याचे सोयरसुतक
बाळगायला या टिकोजीरावाना वेळ आहे कुठे संपादक आणि मालक वर्गाच्या
मागेपुढे करून आपले इप्सित साध्य करायचे आणि मी किती काम करतो याचे दर्शन
घडवायचे.चांगली पत्रकारितेची चळवळ हेच नष्ट करत असल्याने अश्यांना
शहाणपणा शिकवायचा अधिकार नाही.पगार वेळेवर नाही.वय सरल्याने आता अन्य
काही करण्याचे पर्याय हळू हळू संपत चालले आहेत.अश्या स्थितीत पत्रकार
मात्र आपले दुखणे घेवून संपत आहेत.अशी खूप उदाहरणे आहेत.यात आता प्रहार
देखील या परंपरेचा भाग झाला आहे.