महाराष्ट्रनामा ...

आज दि. 27 एप्रिल रोजी साम Tv वर 'आवाज महाराष्ट्र'चा शोचेे एंकर समीरण वाळणेकर होते.
वाळवेकर यांनी दोन महिन्यापुर्वी 'जागृती' चॅनल जॉईन केले होते,परंतु ते आज सामवर दिसल्याचे जागृतीचे कर्मचारी अवाक् झाले...
तर वाळवेवर यांनी साम पुन्हा जॉईन केल्याने 'सोलापुरी ओबामा उर्फ सोलापुरी रंगिला'चे tv वर मिरवण्याचे स्वप्न भंगले...


............................

'जय महाराष्ट्र न्युज'ने नोव्हें १४ पासुन स्ट्रींजर्स'चे थकवलेले पेमेंट अखेर आज रिलीज केले. सहा-सहा महिने पैसेच न मिळाल्याने वैतागलेल्या स्ट्रींजर्स'चा अखेर आज जीव भांड्यात पडला. पण हे किती दिवस चालणार, आता पुढचे पेमेंट थेट सहा महिण्याने मिळणार का? या शंकेने स्ट्रींजर्स चिंतातुर आहेत. नवीन संपादकांनी या प्रश्नात लक्ष घालावे अशी अपेक्षा आहे.

.......................

सोलापुरच्या मानबिंदुतील संपादक आणि सहकारी पत्रकार सध्या 'सी एन एक्स' पुरवणीमुळे त्रस्त आहेत कारण रोज नवी exclusive स्टोरी
देणार कुठून? रोज नवा विषय शोधून शोधून गळाला लागेल त्या विषयास exclusive बनवले जात आहे आणि त्यांच्याच पत्रकारांकडून याची चर्चा बाजारात होत आहे
दुसरीकडे वितरण विभागातून शहरातील 25 टक्के विक्रेत्यांना मोबाइल वाटप सुरु आहे. जो तो विक्रेता बाजारात लोकमतचा मोबाइल दाखवत आहे आणि त्यांचे 2 रूपयातील अंक विक्री न होता कुठे जात आहे हे न सांगणेच बरे.