रंगीला अन ठाण्याच्या माजी ब्युरो चीफ मध्ये जुंपली

सध्या पद्मश्रींच्या पेपर मध्ये रंगीला औरंगाबादी आणि ठाण्याच्या एका माजी ब्युरो चीफ मध्ये निवडणुकीत मिळालेल्या "पॉकेट" वरून चांगलाच वाद सुरु आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी अनेक दिग्गज नेत्यांकडून आलेले "वजनदार" "पॉकेट" ठाण्याच्या एका माजी ब्युरो चीफने रंगीला पर्यंत न पोहचवता आपल्याच खिशात टाकले. या कारणावरून रंगीला अन ठाणे माजी ब्युरो चीफ मध्ये चांगलीच जुंपली आहे.
रंगीलाच्या छळाला कंटाळून मी मराठीच्या वाटेवर गेलेल्या ठाणे पुढारीच्या माजी ब्युरो चीफने पुढारी सोडताच रंगीलाची सारी कथा पद्म्श्रीना ऐकवली. ठाण्याचे माजी ब्युरो चीफने पुढारीत परतण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या असून रंगीलाची खुलेआम पोलखोल सुरु केली आहे. ठाणे माजी ब्युरो चीफचे अजून देखील पुढारीचे नावाने येणारे पॉकेट घेणे सुरूच असल्याने आणि ते रंगीला पर्यंत पोहचवणे बंद केल्याने रंगीलाचा जळफळाट झाला आहे. तर पद्मश्रींच्या पेपर मध्ये मध्ये जीव रमलेल्या या माजी ब्युरो चीफचा मी मराठीत प्रवेश झाला असला तरी त्याने स्वगृही परतण्यासाठी कोल्हापूरहून जोरदार सेटींग लावली आहे.