निखिल वागळे यांचा अखेर राजीनामा....

मुंबई - आय.बी.एन.७ चे संपादक राजदीप सरदेसाई यांनी राजीनामा दिल्यानंतर आता आय.बी.एन. - लोकमतचे संपादक निखिल वागळे हेही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त बेरक्याने दिले होते.अखेर हे वृत्त खरे ठरले आहे.वागळे यांनी स्वत: ट्युटरवर ट्युट करून आपल्या राजीनाम्याची माहिती दिली आहे.
६ एप्रिल २००७ रोजी आय.बी.एन.लोकमत सुरू झाले आणि मराठी न्यूज चॅनलमध्ये एक वेगळा इतिहास रचला गेला.पुण्या - मुंबईत सिमीत असलेला इलेक्ट्रॉनिक मीडिया महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहचला.वागळेंनी सर्व रिपोर्टरना त्यांच्याच भाषेत पी.टू.सी.करण्याचे सूचित करून आयबीएन लोकमतची ओळख निर्माण करून दिली.
रात्री १० वाजता वागळे यांचा आजचा सवाल हा चर्चात्मक कार्यक्रम चांगलाच गाजत असे.समोरच्यांना ते बोलू देत नसत असा त्यांच्यावर आरोप होत असे.मात्र ग्रेट भेट कार्यक्रमात ते समोरच्या व्यक्तीस मनमोकळे बोलू देत असत.त्यांची सुदाम मुर्ती,नाना पाटेकर,प्रकाश आमटे,बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर ग्रेट भेट आजही अनेकांच्या स्मरणात आहे.एक मुलाखत घेण्यामध्ये म्हणून वागळे यांचा कोणीही हात धरू शकत नाही.
बागळे यांचा स्वभाव थोडासा हेकट होता.त्यामुळे अनेक कर्मचारी त्यांच्यावर नाराज होत असत.मात्र एखाद्यावर रागावलेले वागळे त्याच्यासोबत नंतर चहा पिवून शेवट गोड करीत असत.
आयबीएनची सुत्रे मुकेश अंबानी यांच्याकडे गेल्यानंतर राजदीप सरदेसाई यांनी एक महिन्यापुर्वी राजीनामा दिला होता.त्याचवेळी वागळे यांनी राजीनामा देवून राजीदिपच्या सोबत आपण असल्याचे दाखवून दिले आहे.खरे तर राजदीप यांनीच वागळेंना इलेक्ट्रॉनिक मीडियात आणले.आय.बी.एन.लोकमतला एक नवा चेहरा देण्याचे काम राजदीप यांनी केले.आता राजदीपच नाहीत म्हटल्यावर वागळ यांनीे देखील अखेर गुडबाय केला आहे.
वागळे हे गेल्या एक महिन्यापासून रजेवर होते.तेव्हास राजीरामा दिल्याची कुणकुण ऐकू येत होती.मात्र आतापर्यंत अनेकवेळा असे प्रसंग आले आणि ते निभावले गेले होते.मात्र आज वागळे यांनीच ट्युटरवर ट्युट करून राजीनामा दिल्याची माहिती दिली आणि आता लोकांना पटले की,वागळे यांनी खरेच आय.बी.एन.लोकमत सोडले.

जाता - जाता :
निखिल वागळे यांनी राजीनामा दिला नसून नव्या मँनेजमेंटने राजीनामा घेतल्याचे वृत्त..
वागळे गेल्यामुळे आय.बी.एन.लोकमतचा चेहरा गेला...
आयबीएन लोकमतच्या संपादक पदासाठी मंदार फणसे यांची जोरदार फिल्डींग तर डॉ.उदय निरगुडकर यांनी देव पाण्यात ठेवले...